मुंबई– छोट्या पडद्यावर राम सीतेची भूमिका साकारणारे लोकप्रिय कलाकार आणि यांची जोडी टीव्हीवरील अत्यंत आवडती जोडी मानली जाते. १५ फेब्रुवारी रोजी गुरमीत आणि देबिनाच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली. या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी ते दोघे अयोध्येला गेले होते. गुरमीतने सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत जे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

गुरमीत आणि देबिनाने १५ फेब्रूवारी २०११ साली लग्न केलं होतं. लग्नाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते दोघे प्रभू राम, माता सीता आणि भक्त हनुमान यांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला पोहोचले. गुरमीतने चाहत्यांसोबत फोटो शेअर करत लिहिलं, ‘जय श्री राम, आम्हा दोघांसाठीही हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. हा क्षण आमच्यासाठी खास आहे. हा दिवस माझ्या आवडत्या दिवसांपैकी एक आहे. आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत.’

गुरमीत आणि देबिना चे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत. फोटोत ते दोघे नदी किनाऱ्यावर हात जोडून उभे असलेले दिसत आहेत. दोघांनी गळ्यात फुलांच्या माळादेखील घातल्या आहेत. या फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवली असून अनेकांनी त्यावर कमेंटदेखील केल्या आहेत. तुमची जोडी म्हणजे जणू राम-सीतेची जोडी आहे, असंही चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिलं. गुरमीत आणि देबिना यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी दान केले. या दोघांच्या प्रेमाची सुरुवात टीव्हीवरील कार्यक्रम ‘रामायण’ मधून झाली होती. त्यामुळे प्रभू राम आणि सीता यांना त्या दोघांच्याही मनात विशेष स्थान आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here