अहमदनगर: भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा (Trupti Desai) यांनी समाजवादी पक्षाचे नेते (Abu Azmi) यांच्यावर महिलांबाबत वक्तव्य केल्या प्रकरणी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. अबु आझमी याचं डोकं ठिकाणावर आहे का, असा सवाल करत महिलांविषयी असं बोलताना लाज कशी वाटत नाही, अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली आहे. (trupti desai criticizes )

सध्या महाराष्ट्रातील काही मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप करण्यात आलेले आहेत. त्याच प्रमाणे सत्ताधारी पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांवर देखील बलात्काराचे आरोप करण्यात आलेल आहेत. या प्रकरणांमध्ये एफआयआर देखील दाखल झालेला आहे. परंतु, ना कोणत्याही मंत्र्यावर आणि पदाधिकाऱ्यावर कारवाई केली गेली, ना कोणाला अटक केली गेली. या प्रकरणांमध्ये ज्या पीडिता समोर येत आहेत, ज्या महिला समोर येत आहेत त्यांनाच बदनाम करण्याचा डाव सरकारच्या माध्यमातून आखला जात आहे, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

देसाई पुढे म्हणाल्या की, आपले मंत्री आणि आपले सहकारी अडचणीत आल्याचे पाहून त्यांचे सहकारी त्यांना पाठिशी घालण्याचे काम करत आहेत.

‘अबु आझमी, महिलांची जाहीर माफी मागा’

अशा परिस्थितीत सप नेते अबु आसिम आझमी यांचे वक्तव्य समोर आले असून ते अत्यंत निषेधार्ह असल्याचे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. अबु आझमी, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल करतानाच, महिलांची बदनामी का करत आहात?, महिलांचा अपमान का करत आहात?. आपण महिलांची जाहीर माफी मागितली पाहिजे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. आपल्याला जर महाराष्ट्रात राहायचे असेल तर महिलांचा सन्मान करायला शिका, असा सल्लाही देसाई यांनी अबु आझमी यांना दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा- काय म्हणाले होते अबु आझमी?

महिलांबाबत वक्तव्य करताना सप नेते अबु आसिम आझमी म्हणाले होते, की आपल्या देशात कायदा चुकीचा आहे. कारण कायद्यानुसार कोणतीही स्त्री लग्नाशिवाय कोणत्याही व्यक्तीसोबत राहू शकते. म्हणजेच ती लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू शकते. लिव्ह इन रिलेशन म्हणजे काय तर, महिला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात. तेव्हा त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही. आणि मग त्या वर्षभरानंतर सांगतात माझा बलात्कार झाला म्हणून.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here