म. टा. प्रतिनिधी,

करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने लागू केलेल्या करोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी (implementation of guidelines on corona) सुरू करण्याचे आदेश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका; तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला देण्यात आले आहेत. जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. मात्र, संचारबंदी () नाही’ असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. (strict on in district)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये करोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले,‘ जिल्ह्यामध्ये करोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कडकपणे करण्याच्या सूचना दोन्ही महापालिका आणि ग्रामीण भागाला देण्यात आल्या आहेत. मात्र, या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास निर्बंध लागू केले जाणार आहेत’

‘सध्या जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी करता येणार नाही. मात्र, जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू नाही’ असे जिल्हाधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले.

चाचण्या वाढविणार
‘पुण्यामध्ये रुग्णसंख्या वाढत असली, तरी काळजी करण्याचे कारण नाही. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. सध्या सरासरी सहा ते साडेसहा हजार नागरिकांच्या चाचण्या केल्या जातात. हे प्रमाण सुमारे दहा हजारपर्यंत वाढविण्यात येणार आहे’ असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

मास्क न लावल्यास कारवाई

मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रुग्ण आढळणाऱ्या परिसराचे सर्वेक्षण केले जाणार आहे; तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे’ अशी माहिती जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा-

लग्नसमारंभात जाऊन होणार तपासणी

लग्न समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली असून, या समारंभाच्या ठिकाणी गर्दीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. लग्नसमारंभामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी मास्क लावले आहेत की नाहीत, हे समारंभाच्या ठिकाणी जावून तपासले जाणार आहे’ असे जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here