मुंबई:
दिल्लीच्या शाहीनबागच्या धर्तीवर मुंबईतली नागपाडा परिसरात महिलांचे , , NPR विरोधात सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र सहा दिवसांनंतरही हे आंदोलन मागे घेण्यास महिला तयार नाहीत. अरबिया हॉटेल ते मदनपुरा इतका परिसर या आंदोलनाने व्यापला आहे.

मदनपुरा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल भागातली महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. सीएए आणि एनआरसी रद्द करावे, या मागणीसाठी रविवार रात्रीपासून या महिला ठिय्या आंदोलन करीत आहेत. त्या महिलांना पाठिंबा देण्यासाठी पुरुषही रस्त्यावर उतरले होते.

दिल्लीतील शाहीन बाग परिसरात सीएए आणि एनआरसी विरोधात महिला आंदोलन करीत आहेत. त्यापासून प्रेरणा घेत, शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मुंबईतील नागपाडा परिसरात आंदोलन सुरू केले. आंदोलनाची तीव्रता पाहून कडेकोट बंदोबस्त या परिसरात ठेवला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here