नवी दिल्ली : कॉर्पोरेट विश्वात आघाडीचे उद्योजक म्हणून अलीकडच्या काळात नवारुपाला आलेल्या यांनी एक नवा विक्रम केला आहे. अदानी यांनी आशियातील सर्वात असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा यांना धक्का दिला आहे.

नुसार जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांच्या यादीत अदानी यांनी तब्बल सहा स्थानाची झेप घेतली आहे. अदानी यांनी थेट २९ व्या स्थानावर झेप घेतली आहे. या यादीत मुकेश अंबानी ११ व्या स्थानी आहेत. याच काळात अंबानी यांची नेटवर्थ ७९.७ अब्ज डॉलर झाली आहे. त्यात ३.०३ अब्ज डॉलरची वाढ झाली. अंबानी यांनी अमेरिकेचे उद्योजक लॅरी एलिसन यांच्या पछाडले आहे.

या यादीत गौतम अदानी यांनी २९ व्या स्थानी झेप घेतली आहे. त्यांची नेटवर्थ ४२.९ डॉलर आहे. मात्र त्यांच्या नेटवर्थमध्ये अंबानी यांच्या तुलनेत अधिक वाढ झाली आहे. अदानी यांची नेटवर्थ ३.०७ अब्ज डॉलरने वाढली आहे. अदानी यांनी अंबानी यांच्या तुलनेत अधिक कमाई केली आहे. अदानी समूहाच्या अदानी एंटरप्राइसेस आणि अदानी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपन्या देशातील ५० आघाडीच्या कंपन्यामध्ये आहेत.

मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार अदानी एंटरप्राइसेसचे बाजार भांडवल ८७००० कोटी आहे. तर अदानी ट्रान्समिशनचे बाजार भांडवल ८२०९० कोटी आहे. ही कंपनी ५० व्या स्थानी आहे. सध्या भारतात रिलायन्स इंडस्ट्रीज ही सर्वात मूल्यवान कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल १३३९९३५ कोटी आहे. १६ सप्टेंबर २०२० मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २३६९ रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला होता.

दरम्यान, Bloomberg Billionaires Index नुसार जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांमध्ये अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझाॅस १९१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अव्वल स्थानावर आहेत. तर दुसऱ्या स्थानावर टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क आहेत. त्यांची संपत्ती १९० अब्ज डॉलर्स आहे. तिसऱ्या स्थानी मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स आहेत. चौथ्या स्थानी फ्रान्सचे उद्योजक बर्नार्ड अरनॉल्ट असून त्यांची संपत्ती ११६ अब्ज डॉलर आहे.

पाचव्या स्थानी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग असून त्यांची संपत्ती १०४ अब्ज डॉलर्स आहे. सहाव्या स्थानी चिनी उद्योजक जोंग शैनशेन असून त्यांची संपत्ती ९७.४ अब्ज डॉलर्स आहे. याच यादीमध्ये सातव्या स्थानी अमेरिकी उद्योजक लॅरी पेज असून त्यांची संपत्ती ९७.४ अब्ज डॉलर आहे.

आठव्या स्थानी गुगलचे संस्थापक सर्गेई बिन ९४.२ अब्ज डॉलर असून नवव्या स्थानी प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे आहेत. बफे यांची संपत्ती ९३.२ अब्ज डॉलर आहे. तर दहाव्या स्थानी स्टीव्ह बाल्मेर आहे. त्यांची संपत्ती ८७.६ अब्ज डॉलर आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here