‘सरकारच्या निर्णयामुळे नागरिक नाराज’
केंद्र सरकारने इतर अनेक निर्बंध हटवले. पण गेल्या ८ महिन्यांपासून सर्व रेल्वे गाड्या चालवण्यास परवानगी दिली नाही. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. गुरुवारी होणाऱ्या ‘रेल रोको आंदोलनात’ गावातील नागरिक सहभागी होतील, असं टिकैत म्हणाले. एएनआयने हे वृत्त दिलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने गेल्या आठवड्यात ‘रेल रोको आंदोलन’चा इशारा दिला होता.
शेतकर्यांच्या रेल रोकोच्या इशाऱ्यानंतर रेल्वेनेही तयारी केली आहे. रेल्वे देशभरात रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्सच्या २० अतिरिक्त कंपन्या तैनात केल्या आहेत. म्हणजेच सुमारे २० हजार जवान देशभरात तैनात करण्यात आले आहेत. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालवर रेल्वेने लक्ष केंद्रीत केलं आहे. शेतकऱ्यांनी प्रवाशांची गैरसोय करू नये, अशी आमची इच्छा आहे. हे आंदोलन ४ तास शांतते व्हावं, अशी आमची अपेक्षा आहे’, असं रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितलं. पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
‘रेल रोको आंदोलन’ करण्यास भाग पाडले गेले आहे. नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा या आंदोलनाचा उद्देश आहे, असं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. ‘सर्व रेल्वे मार्गांवर आंदोलन करणार आहोत. दिल्लीत येणारे मार्गही रोखू. संपूर्ण आंदोलन नियोजनानुसार होईल याची खात्री केली जाईल. रेल रोको आंदोलनाचा हेतू हा सरकार दबाव आणण्याचा आहे, असं पंजाबमधील किर्ती किसान युनियनचे जितेंद्र सिंग शीना यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times