नवी दिल्ली: पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ( ) कॉंग्रेसने ( ) राज्यातील सात महापालिकांवर विजय मिळवत भाजपचा ( ) सुपडा साफ केला आहे. मोहाली महापालिकेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. तर जे निकाल समोर आले आहेत त्यात भाजपला मोठा झटका बसल्याचं बोललं जातंय. गेल्या अनेक महिन्यांपासून पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम निवडणुकांवर झाला का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट, बटाला आणि भटिंडा या महापालिका कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. भटिंडा महानगरपालिकेवर कॉंग्रेसने ५३ वर्षानंतर विजय मिळवला आहे. त्याचबरोबर पंजाबच्या १०९ नगरपालिका-नगर पंचायतींची मतगणना सुरू आहे.

दिल्लीच्या गाझीपूर, सिंघू आणि टिकारी सीमेवर पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि इतर राज्यांतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता तीन महिने होत आले आहेत. अशा परिस्थितीत सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकर्‍यांच्या प्रमुख आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी कमी होताना दिसून येत आहे. पण आंदोलनाला पूर्वीपेक्षा अधिक धार येत असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे.

शेतकरी आंदोलनावरून कॉंग्रेस सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला करत आहे. कॉंग्रेस पक्षाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही किसान पंचायतमध्ये भाग घेतला. मी तुमची साथ सोडणार नाही, तुम्ही माझे प्राण, माझा धर्म आहात, असं बिजनौर येथे आयोजित किसान पंचायतीत प्रियंका गांधी म्हणाल्या.

पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता शेतकरी आंदोलनावरून कॉंग्रेस पंजाबमधील भाजप विरोधातील वातावरण आपल्याकडे वळण्यास यशस्वी होताना दिसतेय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here