वाचा:
शहरातील ओम साई अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रणितचे वडील अभियंता तर आई वैशाली गॅस एजन्सीचे काम पाहतात. मागील वर्षी नितीन पाटील हे घरी नसताना दुपारच्या सुमारास एक अनोळखी महिला आणि एका पुरुषाने चोरीच्या उद्देशाने प्रणितच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी मिरचीचा स्प्रे प्रणितची आई वैशाली हिच्या तोंडावर मारला. वैशाली पाटील यांनी चोराची कॉलर पकडून विरोध करण्याचा प्रयत्न केला पण चोरट्याने त्यांना मारहाण करत ढकलून दिले. याच वेळी अवघ्या १२ वर्षांच्या प्रणितने चोरट्याचा पाय घट्ट पकडून ठेवला. त्यामुळे त्याला पळता येत नव्हते. बराच वेळ प्रणितने त्याला घट्ट पकडून ठेवले. त्यावेळी घरातील काम करणाऱ्या लताबाईने गॅलरीत जाऊन आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रणितने धाडस केल्याने वैशाली पाटील यांचे प्राण वाचले.
वाचा:
तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी प्रणितच्या या धाडसाचे कौतुक करून बाल शौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे सूचवले होते. त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मंगळवारी राज्य बाल आयोग कार्यालयातून अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी फोनवरून प्रणितला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचे पाटील कुटुंबीयांना सांगितले. प्रणितची निवड राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कारासाठी झाल्याची माहिती त्याचे वडील नितीन पाटील यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात दुसरा बाल शौर्य पुरस्कार
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील नीलेश भील याची या सन्मानासाठी निवड झाली होती. नीलेश याने आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत बुडणाऱ्या बालकांचा जीव वाचवला होता. त्यानंतर आता प्रणित याने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवला आहे. त्याचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times