मुंबई, : किंग्स इलेव्हन पंजाबने काही दिवसांपूर्वी आपल्या संघाचे नाव बदलले होते. पण आता आयपीएल लिलावाच्या एक दिवस अगोदर त्यांनी आपल्या संघाचा लोगो बदलल्याचेही पाहायला मिळत आहे. हा लोगो आता त्यांनी किती लकी ठरतो, हे लिलावाच्या दिवशी समजणार आहे.

किंग्स इलेव्हन पंजाबने पंजाब किंग्स असे आपल्या संघाने नवीन नाव ठेवले आहे. त्याचबरोबर आज आपल्या नवीन लोगोचेही त्यांनी अनावरण केले. गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाची कामगिरी चांगली झाली होती. पण त्यांना फायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या संघाची चांगली मोट बांधण्यात आली आहे. त्यामुळे आता लिलावात ते कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पंजाबच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलला मोठी किंमत मोजत आपल्या संघात स्थान दिले होते. पण गेल्या हंगामात मॅक्सवेल हा पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्याचबरोबर पंजाबच्या संघाने धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेललादेखील पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळवले नव्हते. पण गेल खेळायला लागल्यावर त्याने धावांचा डोंगर उभा करून दिला होता. त्याचबरोबर राहुल आणि मयांक अगरवाल यांची सलामीही भन्नाट झाली होती.

प्रीती झिंटाची मालकी असलेल्या पंजाबच्या संघाला आयपीएलचे सर्व हंगाम खेळणाऱ्या अद्याप एकही विजेतेपद मिळवता आले नाही. पंजाबला एकदा उपविजेतेपद तर एकदा तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचले आहेत. १४व्या हंगामात हा संघ एका नव्या नावासह मैदानात उतरेल. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब संघ मोठ्या कालावधीपासून नावात बदल करण्याचा विचार करत होता. हा निर्णय अचानक घेतलेला नाही. या आयपीएलच्या आधी बदल करणे योग्य वाटले. मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि करण पॉल हे या संघाचे मालक आहेत. गेल्या हंगामात पंजाबने केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व दिले होते. या संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे आहेत. १४व्या हंगामात पंजबाने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला रिलिझ केले आहे. आता दोन दिवसांनी होणाऱ्या मिनी लिलावात हा संघ कोणत्या खेळाडूंना विकत घेतो हे पाहावे लागले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here