वाचा:
राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती होत नसल्याने पुढे काय करायचे यावर महाविकास आघाडीतील , आणि या तीनही पक्षांची चर्चा झाली आहे. राज्यपालांविरुद्ध आम्ही कोर्टात जाऊ शकतो का, याबाबत कायदेशीर बाबी तपासण्यात येत आहेत. जर कोर्टात जाता येत असेल तर ते पाऊल आम्ही उचलणार आहोत, असेही पटोले यांनी नमूद केले. ही नियुक्ती न झाल्यास घटनात्मक पेच कसा निर्माण होऊ शकतो, हे पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
वाचा:
राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त असल्याने संविधानिक पेच निर्माण होणार आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष असताना विधिमंडळाच्या समित्या तयार केल्या होत्या. नामनियुक्त सदस्य आल्यावर त्या समित्या पूर्ण होणार होत्या, पण अद्याप सदस्यांच्या नावाला मंजुरी मिळाली नसल्याने समित्यांवरची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विधिमंडळ समित्यांचे जे कामकाज सुरू आहे ते संविधानिक आहे की असंविधानिक हा पेच राज्यपालांच्या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे. या समित्या असंविधानिक असतील तर तातडीने रद्द कराव्या लागणार आहेत, असेही पटोले यांनी नमूद केले.
वाचा:
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आणि हे पद पक्षात कुणाला द्यायचे हे श्रेष्ठी ठरवणार, असे एका प्रश्नाच्या उत्तरात पटोले यांनी स्पष्ट केले. धनंजय मुंडे आणि संजय राठोड यांच्याबाबतही पटोले यांनी स्पष्ट मत मांडले. मंत्र्यांवर जे आरोप झाले आहेत त्याची चौकशी सुरू आहे. त्या दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी ती बाब हाताळत आहेत. चौकशीत कुणी दोषी आढळलं तर निश्चितच कारवाई होईल, असा विश्वास आहे, असे पटोले यांनी नमूद केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times