म. टा. प्रतिनिधी, नागपूर

राज्याचे (Anil Deshmukh) यांच्या सिव्हिल लाइन्समधील बंगल्यावर तैनात पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास कोराडी मार्गावरील नांदगाव फाटा येथे घडली. संजय धनराज नानवरे, असे मृतकाचे नाव आहे. ( posted at anil deshmukh’s bungalow died in )

संजय हे गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर गार्ड होते. बुधवारी रात्री मोटरसायकलने ते कर्तव्यावर हजर राहण्यासाठी घरून निघाले. नांदगाव फाटा परिसरात एमएच-४०-बीएल-७९६८ या क्रमांकाच्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. यात संजय यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. ट्रकचालकाचा अटक करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी लावली होती. वृत्त लिहिपर्यंत पोलिस ट्रकचालकाचा शोध घेत होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here