कोल्हापूर : कोल्हापूरची ओळख ही कुस्तीपंढरी म्हणून. कोल्हापुरातील मल्लांनी देश विदेशातील ख्यातनाम पैलवानांना लाल आखाड्यात चितपट केलं. कोल्हापूरच्या मल्लांनी देशाच्या विविध भागातही लाल मातीचा आखाडा गाजविला. हिंदकेसरी, महानभारत केसरी, डब्बल महाराष्ट्र केसरी, अशा मानाच्या गदा मिळवल्या. हा झाला पूर्वेइतिहास. मात्र गेल्या काही वर्षात कोल्हापूरला क्षेत्रात म्हणावे तसे यश मिळाले नाही. कोल्हापुरात पैलवान आहेत, कसून तयारी करतात. मात्र यश हुलकावणी देत असल्याचे चित्र आहे. कोल्हापूरच्या मल्लांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकावी यासाठी एका मल्लानेच जंगी बक्षीस जाहीर केले आहे. winner of will be awarded unique prize]

गंगावेश तालमीचे मल्ल, कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ते तसेच पश्चिम महाराष्ट्र पोलिस दलाचे पैलवान संग्राम कांबळे यांनी अनोखे बक्षीस जाहीर केले आहे. ‘२०२१ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापुरातील शाहू विजय गंगावेश तालीममधील कोणत्याही मल्लाने जर ‘महाराष्ट्र केसरी’ किताब मिळवला तर त्या मल्लाची विजयी मिरवणूक हत्तीवरुन काढू’अशी घोषणा पैलवान संग्राम कांबळे यांनी केलीआहे.

नवोदित मल्लांना प्रोत्साहित करणारी भूमिका मांडताना पैलवान संग्राम कांबळे म्हणाले, ‘शाहू विजयी गंगावेश तालीमने ‘महाराष्ट्र केसरी’च्या अनेक गदा मिळवल्या आहेत. पहिले डबल महाराष्ट्र केसरी पैलवान गणतराव खेडकर हे गंगावेश तालीमचे मल्ल. त्यानंतर अनेक पैलवानांनी तालीमला गदा मिळवून दिल्या. गंगावेश तालीम मैदानी कुस्तीत क्रमांक एकची आहे.

मात्र गेल्या काही वर्षापासून मल्ल महाराष्ट्र केसरी कुस्तीपर्यंत पोहचत नाहीत. आजमितीला माऊली जमदाडे, सिकंदर शेख, प्रकाश बनकर, दत्ता नरळे सारखे राष्ट्रीय मल्ल येथे सराव करत आहेत. इतर अनेक जिल्ह्यातून प्रतिनिधीत्व करतात. यापैकी कोणीही ‘महाराष्ट्र केसरी’किताब जिंकला तर कोल्हापूरच्या आजवरच्या परंपरेप्रमाणे विजयी मिरवणूक काढू. कोल्हापूर शहरातून जल्लोषी मिरवणूक काढली जाईल.

क्लिक करा आणि वाचा-

कांबळे कुटुंबीयांची तिसरी पिढी कुस्ती क्षेत्रात

पैलवान संग्राम कांबळे हे गंगावेश तालीमचे मल्ल.सध्या ते मुंबई पोलिस दलात आहेत. गंगावेश तालीम संस्थेवर त्यांचे विशेष प्रेम आहे. कांबळे कुटुंबीयांची तिसरी पिढी कुस्ती क्षेत्रात आहे. संग्राम कांबळे यांचे आजोबा भगवान कांबळे, वडील सीताराम कांबळे हे सुद्धा गंगावेश तालीमीचे पैलवान. यामुळे या तालीम संस्थेशी एक वेगळे नाते आहे. या तालीम संस्थेतील मल्ल महाराष्ट्र केसरी बनावेत ही प्रामाणिक ईच्छा आहे.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here