सांगली: जिल्ह्यातील (ता. ) येथील (५७) व (५५) या शेतकरी दाम्पत्याचा शेताशेजारील असणाऱ्या पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी घडली असून यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ( )

वाचा:

मिळालेल्या माहितीनुसार, भाटशिरगाव (ता. शिराळा ) येथील अर्जुन लक्ष्मण देसाई यांचे पाझर तलावाजवळ असलेल्या शेताजवळ घर आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अर्जुन यांच्या पत्नी सुमन या पाझर तलावावर गेल्या होत्या. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. पत्नी सुमन पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास येताच अर्जुन देसाई यांनी पाण्यात उडी मारून पत्नी सुमनला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पत्नीला वाचवताना दोघेही बुडाले असे सांगण्यात येत आहे.

वाचा:

ही बाब तलावाजवळच्याच वस्तीत राहणारा त्यांचा सात वर्षीय नातू साकेत देसाई याला दिसली व त्याने सर्वांना सांगितले. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. दुपारी ३ वाजल्यापासून तानाजी गोसावी तसेच पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शोध मोहीम राबवली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी दोघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेने संपूर्ण गाव हळहळले आहे. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात भाटशिरगावमध्ये या दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here