पुदुच्चेरीः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुदुच्चेरीतील राजकीय वातावरण तापलं असताना काँग्रेस नेते ( rahul gandhi ) हे आज प्रचारासाठी दाखल झाले. राहुल गांधी यांनी मच्छीमारांच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी मच्छिमारांच्या ( ) समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्याचा मुद्दा मांडला. यावरून ते आता केंद्रीय मंत्र्यांच्या निशाण्यावर आले आहेत.

राहुल गांधींच्या वक्तव्यावरून हल्ला चढवत केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विट केले आहे. ‘राहुल जी! हे मंत्रालय ३१ मे २०१९ मध्येच पंतप्रधान मोदींनी बनवलं आहे. तसंच २००५० कोटी रुपयांची महायोजना (PMMSY) सुरू केली. जी स्वातंत्र्यापासून २०१४ पर्यंतच्या केंद्र सरकारच्या खर्चाहून (३६८२ कोटी) जास्त आहे’, असं गिरीराज सिंह म्हणाले.

गिरीराज यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. ‘राहुल जी! मी तुम्हाला नवीन मत्स्य व्यवसाय मंत्रालयात येण्याची विनंती करतो किंवा आपण बोलवाल तिथे मी येतो आहे. देशभरात आणि पुदुच्चेरीत नवीन मत्स्य व्यवसाय मंत्रालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांविषयी मी तुम्हाला माहिती देईन’, असं सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

एवढेच नव्हे तर गिरिराज सिंह यांनीही इटालियन भाषेत ट्वीट करुन राहुल गांधींवर टीका केली आहे. त्यांच्यासह स्मृती इराणी यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांनीही इटालिय इटालियन भाषेतून राहुल गांधींवर टीका केली आहे.

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनीही राहुल गांधींवर टीका करत एक ट्वीट केलं. ‘राहुल गांधी जी हे मंत्रालय आणि हे आहेत मंत्री. पुन्हा एकदा खोट्या राजकारणामुळे कॉंग्रेस पक्षाची नाचक्की झाली आहे’, असा टोला ठाकूर यांनी लगावला आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

केंद्र सरकारने तीन नवीन कृषी विधेयकं मंजूर केली आहेत. शेतकरी हा देशाचा कणा आहे. मच्छीमारांसमोर शेतकऱ्यांबद्दल मी हे का बोलतोय? तर मी तुम्हाला समुद्राचा एक शेतकरी मानतो. जमीन असलेल्या शेतकर्‍यांसाठी दिल्लीत मंत्रालय असेल तर समुद्रातील शेतकऱ्यांसाठी ( ) का नाही?, असं राहुल गांधी म्हणाले. मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालयाचा मुद्दा राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही उपस्थित केला होता. कॉंग्रेस केंद्रात सरकार स्थापन केल्यास मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करेल, असं तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते. केरळच्या त्रिशूरमध्ये राष्ट्रीय मच्छीमार संसदेत त्यांनी हे विधान केलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here