ग्रामीण भागांमध्ये आता देखील लग्नसोहळ्यांमध्ये ५ हजार ते १० हजार लोक जमलेले पाहायला मिळतात. कोविडचे रुग्ण वाढत आहेत हे आम्हाला मान्य आहे. यावर आम्ही नियंत्रण मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. परंतु, सरकार एकटे काहीही करू शकणार नाही. लोकांची साथ आवश्यक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना करोनाबाधितांच्या संख्येसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी हे भाष्य केले आहे. राज्य सरकार मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. राज्यातील जनतेला लॉकडाऊन हवा आहे की थोड्या निर्बंधासहीत मोकळेपणाने रहायचे आहे हे जनतेने ठरवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
क्लिक करा आणि वाचा-
अनेकजण मास्क घालत नाहीत. तसेच अनेकजण आरोग्यासंदर्भातील नियम पाळत नाहीत. हे लक्षात घेत जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने अशा लोकांवर कठोर कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी पोलिसांवर असल्यामुळे जराही शिथिलता न दाखवता कडक कारवाई केलीच पाहिजे, असे मुख्यमंत्री ठाकरे बैठकीत म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times