श्रीनगरः श्रीनगरच्या सोंवर भागात बुधवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी एका तरुणावर गोळीबार केला. यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. सोंवर डल लेकपासून १० किमी अंतरावर ही घटना घडली आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बुधवारी २४ देशांतील राजदूत दाखल झाले आहेत. दरम्यान, श्रीनगरपासून ४३ किलोमीटर अंतरावर त्राल येथे सुरक्षा दलांनी स्फोटाचा मोठा कट उधळून लावला आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या स्लीपर सेलच्या ३ सदस्यांना अटक केली.

दरम्यान, पुंछ पोलिसांनी जम्मू विमानतळावर दहशतवादी शेर अलीला अटक केली. तो अनेक दहशतवादी कारवायांचा सूत्रधार आहे. यात दहशतवाद्यांची घुसखोरी, शस्त्रास्त्र तस्करीचा समावेश आहे.

त्रालमध्ये ८ डिटोनेटर्स आणि IED जप्त

त्रालमध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या तीन मदतनीसांना अटक केली आहे. त्यांच्याकडे ८ डिटोनेटर आणि मोठ्या प्रमाणात आयईडी बनवण्याचा साहित्य आढळून आल आहे. शाफत अहमद सोफी, मजीद मोहम्मद भट आणि उमर रशीद वानी अशी त्यांची नावे आहेत. मोठा स्फोट घडवण्याच्या तयारीत होते.

स्लीपर सेल म्हणून काम करत होते

तिन्ही आरोपी हिजबुल मुजाहिद्दीनच्या स्लीपर सेलचं काम करत होते. अवंतीपोरा पोलिस, लष्कराची ४२ आरआर आणि सीआरपीएफच्या १८० व्या बटालियनने त्रालमधील बाटागुंड डडसरा गावात शोध मोहीम सुरू केली. या कारवाईत त्यांना पकडण्यात आलं. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

त्राल आणि अवंतीपोरा भागातील हिज्बुल मुजाहिद्दीन दहशतवाद्यांना शस्त्रे, दारुगोळा आणि रसद पुरवण्याचे काम अटक केलेले तिघेजण करत होते. डडसरा येथील छापेमारीत वेळी सुरक्षा दलांनी त्यांच्या घरातून आयईडी बनवण्याचं साहित्य जप्त केलं. यामध्ये ८ इलेक्ट्रिक डिटोनेटर, ७ अँटी मॅकेनिझीम स्विचेस, ३ रिले स्विचेस, दुसरा स्विच आणि अँटी माइन वायरलेस अँटेना जप्त करण्यात आले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here