नगर: न्यायालयात साक्ष देताना ‘देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही’ अशी शपथ दिली जाते. तरीही फुटतात, कधी खोटेही बोलतात. मात्र, नगरच्या एका न्यायालयात अशी खोटी साक्ष देणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश यांनी न्यायालयात खोटं बोलणाऱ्या महिला साक्षीदाराला चांगलाच झटका दिला आहे. एका दिवाणी खटल्यात मृत व्यक्तीची पत्नी असल्याचे खोटेच सांगत साक्ष देण्यासाठी ही महिला आली होती. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. अशा प्रकारे विश्वासघात करणे हा एक प्रकारे मानसिक खूनच आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. ( )

वाचा:

येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात एक दिवाणी खटला सुरू होता. त्यामध्ये उर्फ लीलाबाई आबा लगड (रा. शिरूर) या महिलेने खोटी साक्ष दिली. खटल्याशी संबंधित एका मृताची पत्नी बनून, तशी खोटी कागदपत्रे तयार करून ही महिला कोर्टात आली होती. कोर्टात सुनावणी सुरू असताना न्यायाधीश पाटील यांच्यासमोर हा प्रकार उघडकीस आला. पुराव्यांची पडताळणी करून न्यायालयाने या महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९५ (ब) (१), भारतीय दंड विधान कलम १९१ व १९३ अंतर्गत लीलाबाई काटे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोष सिद्ध झालेल्या आरोपीला सात वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

वाचा:

निकालपत्रात न्यायाधीश पाटील यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. न्यायालयात देवाची शपथ घेऊन खोटी साक्ष देणे हा न्यायदेवतेचा अवमान असून गंभीर स्वरूपाचा गुन्हाही आहे. विश्वासघात, विश्वासभंग म्हणजे व्यक्तीस भावनिक, मानसिकरित्या ठार मारणे होय. एखाद्याला जीवानीशी ठार केल्यास शरिराबरोबरच त्याच्या भावनाही मृत होतात. मात्र विश्वासघात, विश्वासभंग प्रकरणात पिडित व्यक्तीला आयुष्यभर त्याच भावनांबरोबर जगावे लागते. त्याला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा प्रकारे न्यायालयाबरोबरच सर्वसामान्यांचा विश्वासघात, विश्वासभंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात आली तरच गुन्हेगारांना आळा बसेल.’ त्यानुसार या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी आता नगरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर होणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here