वाचा:
सातत्याने होत असलेल्या इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ ‘ केले. हे आंदोलन राज्यव्यापी होते. महाराष्ट्रात प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात हे आंदोलन एकाचवेळी करण्यात आले. रोजच होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे युवक काँग्रेसच्या या आंदोलनात सामान्य नागरिकांचा उस्फूर्त सहभाग दिसून आला, असा दावा करण्यात आला.
वाचा:
अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मीरा भाईंदर शहरात विश्वासघात आंदोलनात नेतृत्व करताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ‘सबका साथ, सबका विकास’ चा विश्वास देऊन मोदींनी २०१९ साली दुसऱ्यांदा सत्ता हातात घेतली. इंधन आणि घरगुती गॅसचे दर कमी होतील हेही आश्वासन त्यांनी दिले होते, परंतु सत्तेवर आल्यापासून सतत इंधनाचे दर वाढवले. इतर बाबतीतही पंतप्रधान यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वासघात केला म्हणूनच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने याविरोधात विश्वासघात आंदोलन केले, असे तांबे म्हणाले.
वाचा:
मोदींनी सत्तेत येण्यासाठी प्रत्येक वर्गाला आश्वासने देऊन त्यांची मते घेतली आणि सत्तेत आल्यावर मात्र विश्वासघात केला. पहिल्यांदा वापरून घ्यायचं आणि नंतर विश्वासघात करायचा, ही मोदींची जुनी सवय आहे. मोदी हे आता सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे ऐकून सुद्धा घेत नाहीत. म्हणूनच महाराष्ट्र युवक काँग्रेसला रस्त्यावर यायची गरज पडली, असेही सत्यजीत तांबे म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times