तामिळनाडूमधील एन्नोर-तिरुवल्लूर-बेंगळुरू-पुदुच्चेरी-नागपट्टिनम-मदुराई-तूतीकोरिन नॅचरल गॅस पाइपलाइनच्या रामानाथपुरम-थुथुकुडी विभागाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. आपण इंधनाच्याबाबती आयातीवर इतकं अवलंबून असलं पाहिजे का? मला कोणावरही टीका करायची नाही. पण हे सांगवं लागेल की आपण या विषयाकडे अधिक लक्ष दिलं असतं तर आपल्या मध्यम वर्गाला हा बोजा उचलावा लागला नसता, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या स्त्रोतांच्या दिशेने काम करणं आणि ऊर्जा अवलंबित्व कमी करणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे, असं ते पंतप्रधान मोदी म्हणाले. देशात पेट्रोलची किंमत पहिल्यांदाच १०० रुपयांच्या पुढे गेली. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचा दराने शंभरी गाठली. तर मध्य प्रदेशात ते शतकाच्या अगदी जवळ पोहोचले. देशातील इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दरावर अवलंबून आहेत.
सरकार मध्यम वर्गाच्या अडचणींबाबत संवेदनशील आहे. यामुळेच भारत आता शेतकरी आणि ग्राहकांना मदत करण्यासाठी इथेनॉलवर लक्ष केंद्रीत केले आहे.
ऊसातून निघणाऱ्या इथेनॉलमुळे इंधन आयात कमी करण्यात मदत होईल आणि शेतकऱ्यांनाही उत्पन्नाचा एक पर्याय मिळेल, असे मोदी म्हणाले. सरकार अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांवर लक्ष केंद्रीत करत आहे आणि २०३० पर्यंत देश ४० टक्के ऊर्जेचं उत्पादन करेल. भारताने सुमारे ६.५२ दशलक्ष टन पेट्रोलियम पदार्थांची निर्यात केली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. आपल्या कंपन्यांनी दर्जेदार तेल आणि गॅस मालमत्ता संपादन करण्यासाठी विदेशात गुंतवणूक केली आहे. सरकारने पाच वर्षांत तेल व गॅसच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामावर ७.५ लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे. ४७० जिल्ह्यांमधील शहरांमध्ये गॅस वितरण्या नेटवर्कवर भर देण्यात आला आहे. सरकार सध्याच्या उर्जा क्षेत्रात नैसर्गिक वायूचा वाटा ६.३ टक्क्यांवरून वाढवून तो १५ टक्क्यांपर्यंत नेण्याच्या दिशेने काम करत आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times