विनामास्क लोकलने प्रवास करणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या सहा रेल्वे स्थानकांवर एकूण ७८ प्रवाशांवर महापालिकेने कारवाई केली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कारवाईच्या संख्येत ११ प्रवाशांची वाढ झाली. मात्र, मध्य आणि पश्चिम रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करत असताना, केवळ शेकडो प्रवाशांवरच कारवाई होत असल्याने महापालिकेच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी रेल्वे स्थानकात २, वसई रोड रेल्वे स्थानकात ३६ आणि विरार रेल्वे स्थानकात ४० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. अंधेरी स्थानकात प्रतिव्यक्ती २०० रुपये वसई रोड आणि विरार स्थानकात १०० रुपये यानुसार दंड आकारण्यात आला.
वाचा:
करोना संसर्ग वाढत असल्याने महापालिकेकडून रेल्वे स्थानकावर मार्शल नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ते १७ फेब्रुवारी या काळात या दिवसांत एकूण २२१ प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून २२,३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मध्य रेल्वेवरील कारवाईची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत मिळालेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार १२५ पेक्षा जास्त प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आला.
मुंबईकरांनो काळजी घ्या!
मुंबई : मुंबईत रुग्णसंख्या वाढत असून,त्यामुळे लॉकडाउनसारखी परिस्थिती ओढवू नये म्हणून मुंबईकरांनी अधिकाधिक काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी केले. रुग्णसंख्या वाढत राहिल्यास मुंबईकरांना त्याची झळ बसू शकते. त्यासाठीच मुंबईकरांनी अधिकाधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही केले. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे अधिकृत सोशल मीडिया पेज म्हणून ‘द मुंबई झू’ नावाने सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. करोनाचे संकट अद्याप पूर्ण टळलेले नसून, करोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक वावरातील सुरक्षित अंतर आदींचे पालन व्हावे, असेही त्यांनी नमूद केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times