‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली चाचणी करून घ्यावी,’ अशी विनंती त्यांनी केली आहे. ‘जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल, सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे,’ असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेच्या निमित्तानं जयंत पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर फिरत आहेत. आतापर्यंत त्यांनी विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे दौरे केले आहेत. जिल्ह्याजिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे असा त्यांचा कार्यक्रम होता. या दौऱ्यात त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यातूनच त्यांना करोनाचा संसर्ग झाला असावा, अशी शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times