पुण्यातील भोसरीमधील जमीन गैरव्यवहारप्रकरणी खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवरच खडसे यांनी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा ईडीने खडसे यांची चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं देवेंद्र फडणवीस यांचाही जबाब घ्यावा, अशी न्यायालयात मागणी केली आहे. वकील असीम सरोदे यांच्यामार्फत लेखी मागणी दमानिया यांनी केली आहे.
वाचाः
एकनाथ खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे- मिनिट्स ऑफ मीटिंग रद्द करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तर, कोणत्या नियमाच्या आधारे मिनिट्स ऑफ मिटिंग रद्द केले जाऊ शकतात?, असा सवालही दमानिया यांनी केला आहे. ही संपू्र्ण प्रक्रिया शंकास्पद असून कोणाचे जबाब घेणं कायद्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत याची यादीच त्यांनी न्यायालयात सादर केली आहे.
वाचाः
एकनाथ खडसे काय म्हणले?
ईडीने बजावलेल्या समन्सप्रमाणे खडसे ईडीसमोर हजर झाल्यानंतर त्यांची अनेक तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांनी या कारवाईला आव्हान देणारी याचिका केली. त्या वेळी ‘ईडी केवळ चौकशीसाठी बोलवत असेल, तर तुम्हाला भीती कशाची वाटत आहे,’ अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यावर ‘ईडीची ही कार्यवाहीच बेकायदा आहे. समन्सप्रमाणे मी पुन्हा त्यांच्यासमोर हजर झालो आणि त्यांच्या प्रश्नांना मी त्यांना हवी ती उत्तरे दिली नाहीत, तर तपासात सहकार्य करत नसल्याच्या कारणाखाली ते मला अटक करतील, ही भीती आहे. म्हणूनच याचिका करावी लागली,’ असे म्हणणे खडसे यांनी ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांच्यामार्फत मांडले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times