मनमोहन सरकारच्या बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र, आता त्यांनाही शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. भविष्यात महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंग होऊ देणार नाही तसंच, त्यांचे चित्रपटही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराच नाना पटोले यांनी दिला आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच नाना पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, या आधीही त्यांनी इंधन दरवाढीवरुन कलाकारांवर निशाणा साधला होता. युपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते म्हणूनच ७० रुपये लिटर पेट्रोल झाले त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यासह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केले नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही का? अशा शब्दांत नाना पटोले यांनी टीका केली होती.
वाचाः
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times