सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यावर अत्यंत कडवट शब्दांत टीका करणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार यांच्यावर आमदार यांनी नाव न घेता घणाघाती टीका केली आहे. ‘विरोधासाठी विरोध करायचा नाही. शांत बसायचं, पण सावज टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम करायचा असं आमचे गुरू सांगतात,’ असा सूचक इशाराच मिटकरी यांनी पडळकर यांना दिला आहे. ( Attacks )

वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील येथे मनोजबाबा शिंदे यांच्या वतीनं मिटकरी यांच्या शिवचरित्र व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी बोलताना मिटकरी यांनी केंद्र सरकारसह राज्यातील भाजप नेत्यांवर जोरदार तोफ डागली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून पडळकर व मिटकरी यांच्यात वाकयुद्ध रंगले होते. पडळकर यांनी मिटकरी यांच्यावर ‘शिवचरित्र सांगून लाख-लाख रुपये कमावणारा बाजारू’ अशी टीका केली होती. त्या टीकेला मिटकरी यांनी उत्तर दिलं.

‘मी शिवचरित्र सांगितलं. नागज फाट्यावर दारू विकली नाही किंवा कुठल्या आजीची २ कोटींची जमीनही हडपली नाही. तुमची औकात किती? तुम्ही बोलता किती? मी बोलायला लागलो तर पळता भुई थोडी होईल, असं सांगून, ‘माझ्यासवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही,’ असा टोलाही त्यांनी हाणला.

वाचा:

‘भुंकणाऱ्या कुत्र्याकडे बैल एकदा, दोनदा, तीनदा दुर्लक्ष करतो. त्यानंतर मात्र लाथ घालतो. मला आमदारकी देणारे गुरू सांगतात की विरोधासाठी विरोध करायचा नाही. शांत बसायचं. पण सावज टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम करायचा,’ असं ते म्हणाले.

खोटी भाषणं देऊन पंतप्रधान होता येतं!

मिटकरी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘काही लोक म्हणतात, मिटकारी बाजारू आहेत. नुसती भाषणं करतात. पण मी खरी भाषणं देतोय म्हणून आमदार झालोय. खोटी भाषणं दिल्यास पंतप्रधान देखील होता येतं,’ असा चिमटा त्यांनी काढला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here