न्यूयॉर्क : जागतिक तापामानवाढीमुळे हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे ‘फ्लू’चा संसर्ग वेगाने होऊन प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशांना ‘फ्लू’चा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामानात वारंवार होणारा बदल आणि कमी तापमान या कारणांमुळे ‘फ्लू’ वेगाने पसरतो. जागतिक तापमानवाढीमुळे ‘फ्लू’साठी पोषक स्थिती निर्माण होत आहे.
पर्यावरण संशोधनपर पत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, आगामी काळात ‘फ्लू’चा सर्वाधिक धोका असण्याची शक्यता समोर आली आहे. २०१७-१८या वर्षात ‘फ्लू’ने थैमान घातले होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या वर्षी फ्लूमुळे १८६ मुलांचा मृत्यू झाला होता. हे वर्ष आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याची नोंद करण्यात आली आहे, तर २०१२-१३ या तुलनेत मुलांच्या मृत्यूची संख्या कमी होती. या वर्षात १७१ मुलांचा फ्लूमुळे मृत्यू झाला होता. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका, चीन, इटली आणि फ्रान्स या थंड हवामानाच्या देशांत ‘फ्लू’ वाढण्याचा धोका आहे. थंड वातावरणात शरीराची प्रतिकारक्षमता कमी होते. सर्दी, खोकलासारखे आजार लवकर जडतात. यामुळे तापही येऊ शकतो. अशा वातावरणात फ्लूचे विषाणू वेगाने पसरतात. यामुळे आगामी काळात हवामानात वारंवार बदल होणे, हे घातक ठरणार असून, त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times