जळगावः राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना करोनाची लागण झाल्याचं समोर येताच राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याला करोना झाल्याची माहिती समोर येतंय. एकनाथ खडसे यांना पुन्हा करोनानं गाठलं असल्याचं समोर आलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. माझी करोना चाचणी केला असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करुन घ्यावी, अशी मी विनंती करतो, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

जळगावात करोनाचा उद्रेक?

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील जिल्ह्याजिल्ह्यांत दौरे करत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून जयंत पाटील जळगाव दौऱ्यावर होते. तिथून परतल्यानंतरच जयंत पाटील यांना करोनाची बाधा झाल्यानं खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या सून व भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचाही करोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी रात्री पासून रक्षा खडसे यांची प्रकृती बिघडली असता त्यांनी करोनाची चाचणी केली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रक्षा खडसे यांच्यानंतर एकनाथ खडसे यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं जळगाव जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वाचाः

लॉकडाऊनचा इशारा

जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता नागरीकांना काही बंधने पाळावीच लागतील, अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. तसेच घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला मास्क बंधनकारक असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. सात दिवस करोनाचे रुग्ण वाढतच राहीले तर लॉकडाऊन अनिवार्य असेल असेही त्यांनी सांगीतले आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here