मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी अर्थमंत्री (Sudhir Mungantiwar) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nana Patole) यांच्यावर टीकास्त्रं सोडलं आहे. नाना पटोले यांच्या भावनेतून आणि भाषेतून काँग्रेसचा खरा चेहरा व्यक्त होत आहे. काँग्रेसचं वर्णन करायचं झाल्यास, त्यांचा चेहरा लोकशाहीचा, आत्मा हुकुमशाहीचा आणि कृती परिवाराची सेवा करण्याची, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. बिग बी (Amitabh Bachchan) आणि (Akshay Kumar) यांचे महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही किंवा त्यांच्या चित्रपटांचे शूटिंग होऊ देणार नाही, अशी भूमिका पटोले यांनी घेतली होती. त्यावर मुनगंटीवार यांनी ही टीका केली आहे. ( criticizes state congress president )

खरं तर नाना पटोले हे आमचे मित्र आहे. देशात काळे कायदे लागू झाले असे ते सतत सांगत आहेत. मात्र असं सांगताना ते काळे कायदे कोणते, याबद्दल मात्र ते काहीच सांगत नाहीत. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांपैकी दोन कायदे आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. पटोले मात्र याबाबत काहीही बोलत नाहीत, असं सांगताना केंद्राने केलेले कायदे काळे आणि यांनी तेच कायदे केले मात्र यांचे कायदे पांढरे, असा मुनगंटीवार यांनी पटोले यांना टोला लगावला आहे.

‘हेच पटोले तेव्हा काँग्रेसविरोधात बोलत होते’

जेव्हा मावळच्या शेतकऱ्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोळीबार केला त्यावेळी नाना पटोले काँग्रेसच्या विरोधात बोलत होते. काँग्रेस शेतकरीविरोधी आहे असं ते म्हणत होते. काँग्रेसचं शेतकऱ्यांबद्दलचं प्रेम पुतना मावशीचं आहे असं नाना पटोले म्हणत होते. त्यांच सन २००९ मधलं विधानसभेतलं भाषणं काढलं तर त्यांचं काँग्रेसबाबत काय मत होतं ते दिसेल, असंही मुनगंटीवार पुढं म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

डॉ. मनमोहन सिंह हे पंतप्रधान असताना अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी ट्विट केलं होतं. मात्र त्यावेळी नाना पटोले यांनी देखील काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, असं मत व्यक्त केलं होतं, असं सांगत मग मुनगंटीवार यांनी आता नाना पटोले स्वत:वर बहिष्कार टाकतील का?, असा सवाल विचारला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

काय म्हणाले होते नाना पटोले?
डिझेल आणि पेट्रोलची मोठ्या प्रमाणावर दरवाढ आणि गॅसची दरवाढ झाली असून सामान्य लोकांना जगणं कठीण झालं आहे. ज्यावेळी केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांचं सरकार होतं, त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे टिवटिव करत त्यांच्यावर टीका करत असत. आज ते गप्प का आहेत?. महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. तसेच त्यांच्या कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग होऊ देणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here