मुंबईः इंधन दरवाढीने देशात वातावरण तापले आहे. काँग्रेसनंही हा मुद्दा उचलून धरत केंद्रातील मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष यांनी इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कलाकारांवर टीका केली आहे. तर, भाजपनंही कलाकारांची बाजू सावरत काँग्रेसवर पलटवार केला आहे.

केंद्रात प्रणित युपीए सरकार असताना पेट्रोलच्या दरवाढीविरोधात अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करून सरकारवर टीका केली होती. मात्र आज युपीए सरकारवेळी असलेल्या दरापेक्षा मोठी दरवाढ झाली असतानाही हे सेलिब्रिटी मूग गिळून गप्प बसले आहेत, असं म्हणत नाना पटोलेंनी व अक्षयकुमार यांच्या चित्रपटाचे शूटींग व चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू, असा इशारा पटोले यांनी दिला आहे. त्यानंतर भाजपनंही आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट करत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘नाना पटोले काँग्रेस महाराष्ट्रात आणीबाणी लागू करणार आहे का? सत्ता तुमची असली तरी मनमानी चालणार नाही. देश घटनेच्या चौकटीत आणि कायद्यानुसार चालतो, तुमच्या मर्जीनुसार नाही. राज्य कायद्याचे आहे पप्पा किंवा पप्पूचे नाही,’ असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

‘देशहितासाठी भारताचा अभिमान असणारे कलाकार आणि अमिताभ बच्चन यांनी केलेलं ट्वीट हा अपराध असू शकतो? काँग्रेसने कान उघडून ऐकावं देशाच्या हिताच्या बाजूनं जो प्रत्येक व्यक्ती उभा राहील, त्याच्या बाजूने हा अखंड देश उभा राहिल,’ असं भाजप आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here