कोल्हापूर: राज्य बँक गैरव्यवहारात मला अडकवताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी राजकीय डाव खेळला, असा थेट आरोप ग्राम विकास मंत्री यांनी केला आहे. राज्य बँकेच्या गैरव्यवहारातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ( Latest Update )

वाचा:
हसन मुश्रीफ म्हणाले, ‘ यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुती सरकारच्या काळात तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फक्त मला अडकवण्यासाठी कलम ८८ नुसार चौकशी लावली होती. त्याला आपण हायकोर्टातून स्थगिती आणली होती. परंतु, नंतर पुन्हा चौकशी चालू झाली. पुढे महाराष्ट्रात आमचं महाविकास आघाडी सरकार आल्यावर आम्ही माजी न्यायाधीशांची नेमणूक त्यासाठी केली. त्यामध्ये हेच सिद्ध झाले की, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळांने बँकेचे काहीही नुकसान केलेले नाही. उलट बँकेला फायदा झाला आहे’.

वाचा:

या प्रकरणात विनाकारण राजकीय द्वेषभावनेतून मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि आज ‘दूध का दूध पानी का पानी’ झालं. विजय सच्चाईचा असतो. मी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या एकही मिटींगला हजर नाही, तरीसुद्धा यामध्ये राजकीय द्वेषातून मला जाणीवपूर्वक गुंतवले. ज्यावेळी या कारवाई संदर्भात , पांडुरंग फुंडकर, शेकापचे जयंत पाटील इत्यादी मंडळी चंद्रकांत पाटील यांना भेटायला गेली होती. त्यावेळी पाटील यांनी त्या मंडळींना धडधडीत सांगून टाकले की, ही कारवाई फक्त हसन मुश्रीफ यांना अडकविण्यासाठी केली आहे, असा गौप्यस्फोटही मुश्रीफ यांनी केला.

वाचा:

दरम्यान, कोल्हापूरच्या राजकारणात नेहमीच हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळालं आहे. आता राज्य बँकेच्या चौकशीच्या मुद्द्यावरून मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याने या दोघांमध्ये वादाची नवी ठिणगी पडणार हे स्पष्टच आहे. मुश्रीफ यांच्या आरोपांवर अद्याप पाटील यांची प्रतिक्रिया आलेली नाही.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here