मुंबई: उत्तर प्रदेशातील (UP) उन्नाव (Unnao) जिल्ह्यात दोन दलित मुली शेतामध्ये मृतावस्थेत आणि एक गंभीर जखमी अवस्थेत सापडल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. यांपैकी एक मुलगी जिवंत असून तिच्यावर उत्तम उपचार करून तिला वाचवण्याची मागणी होऊ लागली आहे. तिला करून उत्तमातील उत्तम रुग्णालयात तिच्यावर उपचार व्हावेत अशी मागणी होऊ लागली आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री यांनी देखील या पीडित मुलीला मुंबईत उपचार करण्यासाठी एअरलिफ्ट करावे अशी विनंती उत्तर प्रदेश सरकारला केली आहे. ( requests to airlift victim to mumbai)

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. उन्नाव पीडितेला एअरलिफ्ट करून उत्तम उपचारासाठी मुंबईत आणण्यात यावे अशी विनंती राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी उत्तर प्रदेश सरकारला केली आहे. आम्ही उन्नाव पीडितेला उत्तम वैद्यकीय उपचार देऊ आणि राज्य सरकार सर्व उपचाराचा खर्च उचलेल. देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी काही रुग्णालये मुंबईत आहेत. हे लक्षात घेता पीडितेवर मुंबई उपचार झाले तर ते अधिक योग्य होईल असे राऊत यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील एम्समध्ये पीडितेवर उपचार करावेत- चंद्रशेखर आझाद रावण
वाचलेल्या मुलीला एअरलिफ्ट करून दिल्लीतील एम्स रुग्णालयात आणावे अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे. ही मुलगी उन्नाव प्रकरणातील एकमेव साक्षीदार आहे. तिला चांगले उपचार मिळायला हवेत. त्यासाठी तिला तत्काळ एअर अॅम्ब्युलन्सनं दिल्लीच्या एम्सला आणण्यात यावे. तिची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे, असे चंद्रशेखर आझाद रावण यांनी म्हटले आहे

क्लिक करा आणि वाचा- आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मुलींचे मृतदेह कुटुंबीयांनी स्वीकारू नयेत- जिग्नेश मेवाणी

गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी देखील या मुलीला उत्तम उपचार मिळायला हवेत असे म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बळी ठरलेल्या मुलींचे मृतदेह कुटुंबीयांनी स्वीकारू नयेत, असे आवाहनही मेवाणी यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here