करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनांसाठी (corona prevention measures0 केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांच्या ठिकाणी संख्येवर मर्यादा राहील, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. (enforcement of rules for )
रुग्णसंख्या वाढत असल्याने भविष्यात ही परिस्थिती गंभीर होऊ नये, यासाठी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. अन्यथा पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असे राव यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.कोचिंग क्लासेसच्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून मास्कचा वापर आणि सुरक्षित वावर ठेवण्यात येत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी संबंधित कोचिंग क्लास चालकांनी घेण्याचेही त्यांनी सुचविले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
अमरावती जिल्ह्यात एक दिवसाचा लॉकडाउन
अमरावती जिल्ह्याच करोना बाधित रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येत्या रविवारी एक दिवसासाठी संपूर्ण जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही माहिती दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील हा लॉकडाउन शनिवारी रात्री ८ वाजता सुरू होऊन तो सोमवारी सकाळी ७ वाजता संपेल.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान अमरावती, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण वाढत आहेत. यामुळे या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावायचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले होते.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times