मुंबई: राज्यात नियंत्रणात यावा म्हणून सातत्याने फिल्डवर राहून काम करत असलेले राज्याचे आरोग्यमंत्री यांनाही करोनाने गाठले आहे. टोपे यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत खुद्द टोपे यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. आपली प्रकृती चांगली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. ( )

वाचा:

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी’, असे ट्वीट राजेश टोपे यांनी केले आहे.

वाचा:

राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा व प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सातत्याने सर्व स्थितीचा आढावा घेत आहेत. त्याअनुषंगाने बैठकांचेही सत्र गेले काही दिवस वाढले होते. या व्यस्ततेतच टोपे यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. टोपे यांची प्रकृती चांगली असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वाचा:

सध्या तीन मंत्री करोनाच्या विळख्यात

एकाचदिवशी राज्य मंत्रिमंडळातील दोन प्रमुख मंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. गुरुवारी सकाळीच जलसंपदा मंत्री यांना करोनाची लागण झाल्याची बातमी आली होती. पाटील यांनीही ट्वीटरच्या माध्यमातूनच याबाबत माहिती दिली होती. पाटील यांच्यापाठोपाठ दुपारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना तिसऱ्यांदा करोना झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर रात्री टोपे यांचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. एकाच दिवशी राष्ट्रवादीचे तीन प्रमुख नेते करोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही चिंता वाढवणारी बातमी ठरली आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ते सध्या उपचार घेत आहेत.

वाचा:

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाने गाठले आहे. , अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख आदी मंत्र्यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलेली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here