गेल्या महिन्याभरातील आजची सर्वाधिक रुग्णवाढ
गेल्या काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे चिंतेत अधिक भर पडत आहे. आज राज्यात ५ हजार ४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ही महिन्याभरातील सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या महिन्याभरात ही संख्या दोन हजार ते तीन हजारच्या दरम्यान मर्यादित होती.
ही परिस्थिती लक्षात घेत राज्यमंत्री यड्रावकर यांनी जनतेला त्रिसूत्रीची पुन्हा आठवण करून देतानाच राज्य सरकारला नाईलाजाने लॉकडाऊनबाबत विचार करावा लागेल असे मत व्यक्त केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत करोनाबाबत नव्या गाइडलाइन्स जारी
करोना रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने कठोर पावले टाकत करोनासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांनुसार पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणारी इमारत सील केली जाणार आहे. त्याच प्रमाणे गृह विलगीकरण केल्या जाणाऱ्या राहिवाशांच्या हातावर शिक्के मारले जाणार आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांविरुद्धही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
तसेच मंगल कार्यालये, क्लब, उपहारगृहे या ठिकाणी अचानक भेट देत पाहणी केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times