नवी दिल्ली: काँग्रेस नेते ( milind deora ) यांनी ट्वीटमधून ‘मेट्रो मॅन’ ( ) यांचं कौतुक केलं आहे. केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी श्रीधरन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. श्रीधरन यांचे पूर्णपणे व्यावसायिक आणि कुशल अभियंता-नोकरशहा आहेत, असं देवरा म्हणाले. ई. श्रीधरन यांचं सक्रिय राजकारणात स्वागत करण्यासाठी कोणालाही भाजपचे समर्थक असण्याची गरज नाही, असंही देवरा म्हणाले.

काँग्रेसचे दिग्गज नेते मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद म्हणाले, श्रीधरन हे एक पूर्णपणे व्यावसायिक आणि कुशल नोकरशाही आहेत. ई श्रीधरन हे संपूर्ण भारताचे असून आपल्या राजकारणाला त्यांच्यासारख्या बर्‍याच लोकांची गरज आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या मिलिंद देवरा यांच्या या ट्वीटने कॉंग्रेस नेतृत्व नाराज होऊ शकते.

गेल्या वर्षी मिलिंद देवरा यांनी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचं कौतुक केलं होतं. त्यावरून काँग्रेसने त्यांना फटकारलं होतं. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने कॉंग्रेसचा मोठा पराभव केला होता. तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्याबद्दल देवरा यांनी केजरीवाल यांचे कौतुक केले होते. त्यानंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी तीव्र प्रतिक्रिया देत देवरा यांना आपलं राज्य आणि लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here