यांनी करोना साथीच्या मुद्द्यावर पाकिस्तानसह पाकिस्तानसह श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान, मालदिव, अफगाणिस्तान या दक्षिण आशियातील भारताचे शेजारी देश आणि हिंद महासागर क्षेत्रातील मॉरिशस आणि सेशल्ससह इतर देशांच्या आरोग्य प्रतिनिधींशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींनी या कार्यशाळेला संबोधित केलं.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व शेजारी देशांनी पंतप्रधान मोदींनी मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी मांडलेल्या प्रस्तावावर आपल्या क्षेत्रा सहकार्यासाठी रचनात्मक चर्चा करून एकजुटीने पुढे जाण्याची गरज आहे, असं सूत्रांनी सांगितलं. करोनासारख्या साथीच्या संकटाचा सामना सर्व देक्षांनी क्षेत्रीय सहकार्यातून केला पाहिजे, असं या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व देशांनी सांगितलं. पंतप्रधान इम्रान खान यांचे आरोग्य विषयक विशेष सहायक फैजल सुलतान हे या कार्यशाळेत पाकिस्तानचे प्रतिनिधी होते.
करोनावरील लसीचा आपल्या क्षेत्रातील नागरिकांवर किती प्रभावीपणे उपयोग झाला याची माहिती गोळा करणं, ती संकलित करणं आणि तिचा अभ्यास करण्यासाठी सर्व देशांनी मिळून एक क्षेत्रीय व्यासपीठ तयार करण्याची गरज आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. अशाच प्रकारे भविष्यातील कुठल्याही साथीच्या संकटावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानद्वारे एक नेटवर्क स्थापन करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
भारतात यशस्वी ठरलेले आरोग्य धोरण आणि योजनांची माहिती इतर शेजारी देशांना तयार आहे. आयुषमान भारत आणि जन आरोग्य या योजनांवर सर्व मित्र देशांना केस स्टडी करता येईल. अशा प्रकारच्या सहकार्यातून इतर क्षेत्रातही सर्व देशांमध्ये सहकार्य वाढीस लागेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. करोना व्हायरसच्या साथीने आपल्याला सहकार्य आणि एकजुटीचा मोठा धडा शिकवला आहे. ही एकजूट पुढील काळातही कायम ठेवली पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या देशांना केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times