वाचा:
बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. , उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. ‘राज्यात यवतमाळ, अमरावती, सातारा येथील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या प्रत्येकी चार करोनाच्या नमुन्यांचे तसेच पुण्यातील १२ असे एकूण २४ नमुन्यांचे ‘जिनोम सिक्वेसिंग’ करण्यात आले होते. त्यातून हे निष्कर्ष हाती आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाचा:
‘ येथे ‘जिनोम सिक्वेसिंग’ ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता रुग्णालयातील तीन सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांना बेंगळुरू येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्यांनी त्या ठिकाणी राज्यातील चार ठिकाणच्या नमुन्यांचे ‘जिनोम सिक्वेसिंग’ तेथे करून पाहिले. त्यानंतर पुण्यातही ससूनमध्ये ‘जिनोम सिक्वेसिंग’ केले असता त्या चारही जिल्ह्यांमध्ये ब्राझील, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका येथील कोणताही विषाणू आढळला नसल्याचे सिद्ध झाले आहे,’ अशी माहिती डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.
वाचा:
राज्यात करोनाचे रुग्ण वाढताहेत
– राज्यात आज ३८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४८ % एवढा आहे.
– आज राज्यात ५ हजार ४२७ नवीन रुग्णांचे निदान तर २ हजार ५४३ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ८७ हजार ८०४ करोना बाधित रुग्णांनी केली करोनावर मात.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.५ % एवढे झाले.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५५ लाख २१ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ८१ हजार ५२० (१३.४१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times