मुंबई: झालेल्या अनेकांना कोणत्याही प्रकारच्या गंधाची वा वासाची जाणीव होत नाही. गंधाची जाणीव लोप पावली की चव घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. विविध प्रकारच्या वैद्यकीय उपचारपद्धतींचा तसेच औषधांचा, प्रतिजैविकांचा वापर करूनही घेण्याची ही क्षमता अनेक महिने परत येत नव्हती. मात्र त्रस्त झालेल्या रुग्णांना गंध पुनर्जिवित करण्याची नवी थेरपी देण्यात येत आहे. त्याचा परिणामही अल्पावधीमध्ये दिसून येत आहे, ही शारीरसंवेदना नष्ट होईल की काय, या दडपणामध्ये असलेल्या अनेक रुग्णांना ही थेरपी आता लाभदायी ठरत आहे.

वाचा:

या थेरपीमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंचे वा इतर रोजच्या दैनंदिन जगण्यात जाणवणारे गंध ठरवून दिले जातात. दिवसभरात काही कालावधीच्या अंतराने हे वास करोनामुक्त व्यक्तींना दिले जातात. यामागील वैद्यकीय शास्त्र समजावून सांगताना कान- नाक- घसा संघटनेचे उपाध्यक्ष व नानावटी रुग्णालयातील ईएनटी तज्ज्ञ डॉ. अजय डोईफोडे यांनी सांगितले की, मेंदूला मार लागला वा कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यानंतर काही जणांमध्ये मेंदूमधील स्मृती वा माहिती पुसली जाते. नाव, ओळख, पत्ता यासंदर्भातही अनेक प्रश्न पडतात. आपण कोण आहोत, ही ओळखही पुसली जाते. अशावेळी चित्रांच्या, गतस्मृतींच्या तसेच छायाचित्रांच्या माध्यमांतून पुन्हा-पुन्हा ते प्रसंग, व्यक्ती यांच्याशी असलेल्या स्मृतीपटलावर उमटत जातात. पुसून गेलेला भाग पुन्हा आठवतो. त्याचप्रकारे गंध घेण्याचा हा सराव पुन्हापुन्हा केला की मेंदूला तशा प्रकारचे संदेश दिले जातात. त्यातून अमूक एखाद्या वस्तुचा, पदार्थाचा, वातावरणाचा गंध अशा प्रकारचा आहे, याची स्मृती जागी होते व त्यातून गंधाचे नाते पुन्हा जोडले जाते.

वाचा:

वैद्यकीय तज्ज्ञांसह नाक- कान घसा तज्ज्ञांकडे गंध जाणवत नसल्याचा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण खूप मोठे होते. ही जाणीव नाहिशी झाली की काय होते, असा प्रश्न अनेकांना पडतो. गंध घेण्याची जाणीव कमी झाली की चवीवरही परिणाम होतो. अनिच्छाही निर्माण होऊ शकते. अन्न सेवन करण्याचा संबध हा गंध घेण्याच्या क्षमतेवरही असतो. त्यामुळे या दोन्हींचे कार्य परस्परांवर अवलंबून असते. शिवाय एखाद्या विषारी वायूचा वास आला नाही तर अजाणतेपणे तो वायू श्वसनमार्गातून शरीरात जाऊन अपाय करू शकतो वा मृत्यूसाठी कारणही ठरू शकतो, असेही वैद्यकीय विश्लेषण डॉ. डोईफोडे यांनी केले.

अनेकांना लाभदायी

करोनामुक्त व्यक्ती अनेक पातळ्यांवर संघर्ष करत असते. मानसिक, शारीरिक ताण सहन करावे लागतात. वास न येणे, चव न कळणे यामुळे गरम पाणी पिणे, तापमान अधिक असलेल्या अन्नाचे सेवन केल्याने अन्ननलिकेला बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे विविध प्रकारच्या थेरपी केल्यानंतरही वास घेण्याची क्षमता पुनरुज्जीवीत करणारी थेरपी उपयोगी पडत आहे. सध्या अनेक करोनामुक्त व्यक्ती तसे उपचार करून घेत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here