शिवजयंतीनिमित्त आज अजित पवार शिवनेरी गडावर उपस्थित होते. शिवनेरी गडावरील शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांना यानं काढलेल्या मिरवणुकीबद्दल विचारला असता त्यांनी याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. तसंच, यासंदर्भात अधिक माहिती आल्यानंतर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
वाचाः
‘कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं अडचणी निर्माण करणारं कोणीही असेल मग ती राजकीय क्षेत्रातील असेल किंवा गुंडागिरी करणारी असेल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांसाठी नियम लावले गेले पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनी खडसावलं आहे. शिवाय, सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केलं पाहिजे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचाः
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कुख्यात गुंड गजानन मारणे हा पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात तुरुंगात होता. सोमवारी (ता. १५) रोजी त्याची निर्दोष मुक्तता झाली. नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून त्याला सोडण्यात आले. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी तळोजा कारागृहाबाहेर त्याच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. तसेच तेथून शेकडो वाहनांचा ताफा घेऊन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाका येथे मिरवणूक काढली. बेकायदेशीर जमाव जमवून फटाके फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरणही केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times