मुंबई: , अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये अद्याप तरी विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही. जिल्ह्यातील आणखी काही नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळेल व त्यानंतर यात अधिक स्पष्टता येईल, अशी महत्त्वाची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ( )

वाचा:

राज्यातील अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील करोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का, या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

वाचा:

आतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ,दक्षिण आफ्रिका किंवा या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही. पुण्यातील १२ नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत. या अनुषंगाने अधिक तपासणी सुरू असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणे या ठिकाणी जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

वाचा:

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. राज्यात गुरुवारी ५ हजार ४२७ नवीन बाधितांची नोंद झाली. तब्बल ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णसंख्येने पाच हजारचा आकडा ओलांडल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. यात अमरावती विभागात मोठ्या प्रमाणामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ४८ टक्के असून आठवड्याचा हा दर ३५ टक्के इतका आहे तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर १५ टक्के आहे. या दोन्ही जिल्ह्यांत लॉकडाऊनचे कठोर पाऊल उचलावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती विभागात करोनाचा नवा स्ट्रेन आढळलेला नसल्याने तो खूप मोठा दिलासा ठरला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here