म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरात करोनाच्या संसर्गाची तीव्रता वाढत असताना आता ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार वाढत आहे. करोना संसर्गाची साथ अधिक वाढू नये यासाठी आत्तापासून खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी देशमुख यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी आदेश काढला आहे

जिल्हयाच्या ग्रामीण भागात करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास रुग्णांच्या संपर्कात असलेल्या किमान २० लोकांचा शोध घेऊन संबंधित परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित करावे तसेच मंगल कार्यालये, लॉन्स, कोचिंग क्लासेस, शाळा आणि महाविद्यालय, चित्रपटगृहे , शॉपिंग मॉल या ठिकाणांची अचानक तपासणी करून मास्क न घालणाऱ्यांकडून ५०० रुपये आणि दुसऱ्यांदा आढळल्यास हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले ओहत. या ठिकाणी दुसऱ्यांदा अशीच परिस्थिती आढळल्यास संबंधित ठिकाणे १५ दिवस सील करावी किंवा संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.

वाचाः

जिल्हाधिकारी देशमुख यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी आदेश काढला आहे. त्यानुसार इन्सिडंट कमांडर म्हणून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलिस, नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्यावर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वाचाः

खाटा आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करा

जिल्ह्यातील कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हॉस्टिपटलमध्ये असलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यात यावी. या ठिकाणी किती खाटा आहेत आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत का, हे तपासून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले आहेत.

वाचाः

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केलेल्या सूचना

-खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांची बैठक घ्यावी. करोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास रुग्णांची करोना चाचणी करून घ्यावी.

– भाजी मंडई, दुकानदार यांच्या ठराविक अंतराने करोना चाचण्या घेण्यात याव्या.

– सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम घेताना नियमांचे काटेकोर पालन करावे.

– मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांना पास देताना ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच दहा वर्षाखालील लहान मुलांना पास देऊ नयेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here