नवी मुंबई: ‘इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध असतील तर यांची एसआयटी चौकशी करा’, अशी मागणी करतानाच याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री यांना पत्र लिहिणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार यांनी आज सांगितले. सुप्रिया यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी विरुद्ध गणेश नाईक हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. ( Latest News )

वाचा:

नवी मुंबईत सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होतील अशी शक्यता असताना राजकारण चांगलंच तापलं आहे. गणेश नाईक यांचं वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी महाविकास आघाडी एकजुटीने मैदानात उतरली आहे. नाईक यांचे अनेक शिलेदार शिवसेना आणि राष्ट्रवादीला जाऊन मिळाले आहेत. फोडाफोडीमुळे तणावही वाढत चालला आहे. त्यातच गणेश नाईक यांनी एका जाहीर भाषणात शिवसेना आणि राष्ट्रवादीला अत्यंत सूचक शब्दांत धमकी दिली आहे. ‘कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीला घाबरू नका. कुणी गुंडगिरी करत असल्यास रात्री अपरात्री कधीही मला फोन करा. केवळ इथलेच नाहीत तर इंटरनॅशनल डॉनसुद्धा मला ओळखतात. म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही’, असे विधान गणेश नाईक यांनी तुर्भे येथे एका कार्यक्रमात केले होते. त्याचा सुप्रिया सुळे यांनी आज समाचार घेतला. त्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या.

वाचा:

‘ आमदाराच्या गुंडगिरीचा व्हिडिओ समोर आला आहे. या आमदाराने केलेले विधान राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना मी पत्र लिहिणार आहे. याप्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे’, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. यांचा ‘पारदर्शकपणे’ हा लाडका शब्द आहे. त्यानुसार यात पारदर्शकपणे नक्की काय आहे, यांचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळायला हवं. म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल, असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. एप्रिलमध्ये होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही यावेळी सुप्रिया यांनी नमूद केले.

गणेश नाईक राष्ट्रवादीत असताना त्यांना पक्षाकडून पूर्ण सन्मान दिला गेला. ब्लॅंक पेपरवर सही होऊन नवी मुंबईत उमेदवारांची नावे टाकली जात होती. नाईकांच्या घरात आम्ही अन्न खाल्लं आहे, त्यामुळे अन्नाशी गद्दारी कधीच करणार नाही. ते कसेही वागले तरी आम्ही आमची पातळी सोडणार नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here