मुंबईः इंधन दरवाढीवरुन देशात राजकारण तापलं आहे. इंधन दरवाढीवरुन काँग्रेसनं बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. नेते नाना पटोले यांनी आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. यावरुन राज्यात मोठे वादळ उठले आहे. रिपब्लिक पक्षाचे नेते यांनी कलाकारांच्या बाजू घेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

केंद्रात काँग्रेस प्रणित युपीए सरकार असताना पेट्रोलच्या दरवाढीविरोधात अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करून सरकारवर टीका केली होती. मात्र आज युपीए सरकारवेळी असलेल्या दरापेक्षा मोठी दरवाढ झाली असतानाही हे सेलिब्रिटी मूग गिळून गप्प बसले आहेत. भाजपाच्या इशाऱ्यावर टिव टिव करणाऱ्या अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यांचे चित्रपटांचे शूटींग व चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. नाना पटोले यांच्या या विधानानंतर भाजपनं काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी देखील याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

वाचाः

‘काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हिंदी सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचे शूटिंग बंद पाडू अशी धमकी दिली आहे. त्या धमकीचा आम्ही विरोध करतो. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाच्या शूटिंगला रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल,’ असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

वाचाः

तसंच, ‘अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात इंधन दरवाढीवर ट्वीटकरुन निषेध केला होता. याचा अर्थ त्यांनी आज इंधन दरवाढीवर पण ट्वीट करावं असा होत नाही. नाना पटोले यांनी अशी धमकी देणं चांगली गोष्ट नाही,’ असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here