इंग्लंडचा माजी खेळाडू मार्क निकोल्सने यावेळी कोहलीबरोबर बातचीत केली. त्यावेळी कोहलीने एक गोष्ट स्विकार केली की, त्याच्या कारकिर्दीतील तो सर्वात कठिण वेळ होता. त्यावेळी सातत्याने त्याला अपयश मिळत होते आणि असं अपयश मिळणारा मी जगातील एकटाच व्यक्ती आहे, असंही त्याला वाटत होतं. त्या कालावधीत मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो, असे कोहलीने यावेळी सांगितले आहे.
कोहली म्हणाला की, ” माझ्याबाबती अशा काही गोष्टी घडल्या आहेत की, त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. हे विचार करुन नक्कीच चांगलं वाटत नव्हतं की, तुझ्याकडून धावाच होत नाहीत. काहीही केलं तरी धावाच होत नव्हत्या. मला असं वाटतं की, सर्व फलंदाजांच्या बाबतीत ही गोष्ट पाहायला मिळते. त्यावेळी तुम्हाला वाटत असतं की, तुमचं काही गोष्टींवर नियंत्रणच नाही.”
कोहलीसाठी २०१४ साली झालेला इंग्लंडचा दौरा निराशाजनक होता. या दौऱ्यात कोहली पाच कसोटी सामन्यांमध्ये खेळला होता. या पाच कसोटी सामन्यांमध्ये कोहलीची सर्वाधिक धावसंख्या ३९ ही होती. त्याच़बरोबर सहावेळा तर कोहलीला दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नव्हती. त्यावेळी १० डावांमध्ये फलंदाजी करताना कोहलीची सरासरी ही १३.५० एवढी होती. त्याचबरोबर १, ८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६ आणि २० अशी त्याची धावसंख्या होती. पण त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात कोहलीने ही कसर भरुन काढली होती.
याबाबत कोहली म्हणाला की, ” त्यावेळी तुम्हाला हे समजत नसतं की हा कठीण काळ कसा घालवायचा आहे. पण ती एक वेळ हती. कारण ज्या गोष्टी घडत होत्या, त्या बदलण्यासाठी मी काहीही करु शकत नव्हतो. मला या कठीण काळातही पाठिंबा देणारे लोक होते, पण तरीही त्यावेळी मला असं वाटायचं की, मी एकटाच आहे.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times