वाचा:
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित ‘स्मार्ट ग्राम आणि आर. आर. पाटील सुंदर गाव योजना’ पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते अल्पबचत भवन येथे झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सभापती प्रमोद काकडे, बाबुराव वायकर, सारिका पानसरे, पूजा पारगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आदी उपस्थित होते.
वाचा:
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘पुण्यात करोना रुग्णसंख्या ही वाढत आहे. रोखण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त बागळली पाहिजे. त्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, नियमांचे पालन केले गेले नाही, तर जिल्ह्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील.’
अधिकाऱ्यांची गय करणार नाही!
विकासकामांसाठी तरतूद केलेला निधी खर्च होण्याची गरज व्यक्त करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘दळणवळण, रस्ते, पिण्याचे पाणी, शेतीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, तो निधी योग्य प्रकारे खर्च होणे आवश्यक आहे. त्या निधीतून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी विकास कामांचा दर्जा चांगला असला पाहिजे. कामामध्ये हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.’
वाचा:
आबा हे तर आधुनिक युगातील गाडगेबाबा!
‘राज्य सरकारने गावांमधील समस्या सोडविणे आणि विकासकामे होण्यासाठी सरपंच सभांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावांमधील समस्या सुटण्यास मदत होणार आहे,’ असे पवार यांनी सांगितले. आर. आर. आबांनी गावांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण योजना राबविल्या. डान्सबारवर बंदी घालून तरुणांना वाईट प्रवृत्तीकडे जाण्यापासून रोखले. गुटखाबंदी करून व्यसनापासून दूर करण्याचे काम केले. पारदर्शी पोलीस भरती प्रक्रिया राबविली. त्यामुळे त्यांना ‘आधुनिक युगातील गाडगेबाबा’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे पवार म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times