मुंबई: अभिनेता याच्यावर मुंबईतील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेल्मेट आणि मास्कविना बाइक चालवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ‘ ‘ला विवेक ओबेरॉयने बाइकवरून पत्नीला सैर घडवली होती. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात विवेकने हेल्मेट घातलेले नसल्याने तसेच त्याच्या चेहऱ्यावर मास्कही नसल्याने त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी आज कारवाईचे पाऊल उचलले.

सांताक्रूझ वाहतूक विभागातील पोलीस हवालदार संभाजी पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून विवेक ओबेरॉयवर भारतीय दंड विधानाची विविध कलमं, व महाराष्ट्र कोविड- १९ उपायोजना २०२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here