मुंबई: महाराष्ट्रात तब्बल ७५ दिवसांनंतर गुरुवारी ५ हजारावर नवीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज हा आकडा आणखी वाढला असून गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ११२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे चिंता वाढली असून रुग्णवाढ नेमकी कोणत्या कारणांमुळे होत आहे आणि त्याला ब्रेक कसा लावायचा हा प्रश्न आरोग्य यंत्रणेपुढे उभा ठाकला आहे. ( )

वाचा:

महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३० हजारपर्यंत खाली आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. नवीन बाधितांची संख्या वाढत असतानाच तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. राज्यात सध्या ४४ हजार ७६५ रुग्णांवर प्रत्यक्षात उपचार सुरू आहेत.

वाचा:

राज्यातील आजची आकडेवारी चिंता वाढवणारी ठरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ११२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून गेल्या जवळपास पावणेतीन महिन्यांतील ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ ठरली आहे. आज दिवसभरात २ हजार १५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत १९ लाख ८९ हजार ९६३ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यात आज ४४ जणांचा करोनाने मृत्यू झाला असून आतापर्यंत ५१ हजार ७१३ रुग्णांना या आजाराच्या विळख्यात सापडून प्राण गमवावा लागला आहे. राज्यात आतापर्यंत २० लाख ८७ हजार ६३२ रुग्ण करोनातून बरे झाले असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.

वाचा:

राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने नवीन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या स्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी करोनासंबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले आहे. त्याचवेळी नियम पाळले गेले नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावे लागेल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. स्थानिक पातळीवर करोना रुग्णवाढ पाहून त्यानुसार कठोर निर्बंध लावावे वा लॉकडाऊन लावावा, अशी मुभाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यानुसार सर्वाधिक रुग्णवाढ असलेल्या अमरावतीमध्ये कालच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, आज तब्बल ६ हजारावर नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली असून लॉकडाऊनची शक्यता त्यामुळे अधिकच बळावत चालली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here