पुणे: राज्यातील ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाजपचे नेते ठाम शब्दांत सांगत असतानाच उपमुख्यमंत्री यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा यावर महत्त्वाचे विधान केले. अजितदादांनी एकप्रकारे भाजपच्या दाव्यांतील हवा काढून टाकली आहे. ( )

वाचा:

देशाचे गृहमंत्री व भाजपचे चाणक्य अशी ओळख असलेले यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर राज्यात सत्तांतराची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शहा यांनी ‘तीन चाकी रिक्षा’ असा सरकारचा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला होता. त्यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचे थेट संकेत दिले नसले तरी कार्यक्रमात त्यांच्या बाजूला बसलेले विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे मात्र वारंवार तशी विधाने करून वातावरणनिर्मिती करत आहेत. राज्यातून ठाकरे सरकार पायउतार होणार आणि सरकार राज्यात येणार, असं या नेत्यांचं ठाम मत आहे. या अनुषंगाने अजित पवार यांनी आज केलेल्या विधानाला विशेष महत्त्व आहे.

पाहा:

राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत विचारले असता ‘सध्या तरी सरकारला कोणताही धोका नाही’, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत सध्या तरी सर्व काही आलबेल असल्याचेच सांगण्याचा अजित पवार यांनी प्रयत्न केला आहे.

लवकरच मोठी पोलीस भरती

राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार आहे, असे नमूद करताना पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी सावध भूमिका घेतली. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे, असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य टाळले. उद्योगपतींनी दिलेल्या गाड्या अधिकाऱ्यांनी घेणे योग्य नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात अजितदादा म्हणाले. त्यांनी गुंड गजा मारणेची मिरवणूक आणि चोरट्यांचा पाहून पळालेले पोलीस या घटनांवरून पुणे शहर पोलिसांचे कान टोचले. गुन्हेगाराची मिरवणूक निघण्याच्या घटना घडतात त्याच्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा, चोरी घडणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी, असे अजितदादांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here