मुंबई: करोनावरील लस घेतल्यानंतरही ठाण्यातील दोन पोलिसांना संसर्गाची लागण झाली आहे. या दोघांचीही करण्यात आली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या प्रकारामुळे काहीशी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. ( Latest News )

वाचा:

घाटकोपर पोलीस ठाण्यात सेवेत असलेल्या या दोन कॉन्स्टेबल्सनी राजावाडी रुग्णालयात करोना प्रतिबंधात्मक लसचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी या दोघांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी एका पोलिसाला चार ते पाच दिवसांपासून करोनासदृष्य लक्षणे दिसत होती. करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या या दोन्ही पोलिसांवर उपचार सुरू आहेत व त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे घाटकोपर पोलिसांनी सांगितले.

वाचा:

दरम्यान, राज्यात युद्धपातळीवर सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांपाठोपाठ सध्या पोलिसांना लसचा पहिला डोस देण्यात येत आहे. संपूर्ण राज्यभरात एकाचवेळी ही लसीकरण मोहीम सुरू आहे. यादरम्यान, मुंबईत लसीकरण झालेल्या दोन पोलिसांना करोनाची लागण झाल्याने काहीसे चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुख्य म्हणजे राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी राज्यात ६ हजारावर नवीन करोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर लसीकरणानंतरही करोनाची लागण होत असल्याची बातमी काळजी वाढवणारी ठरली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here