पुणे: तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पुण्यात येताना गुंड याच्या जंगी मिरवणुकीसाठी वापरण्यात आलेली आलिशान कार काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याची असल्याचे समोर आले आहे. कोथरूड पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. ( )

वाचा:

कारागृहातून सुटल्यानंतर समर्थकांनी काढलेली जंगी मिरवणूक चांगलीच वादग्रस्त ठरली आहे. या प्रकरणी गजा आणि त्याच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे तर उपमुख्यमंत्री यांनी या प्रकारावरून पोलिसांनाही धारेवर धरले आहे. गुन्हेगाराची मिरवणूक निघण्याची घटना घडतेच कशी, असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी पुणे पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या कारबाबत जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक आहे.

वाचा:

गजा मारणे तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर अलिशान कारने पुण्यात आला होता. तो ज्या कारमध्ये होता ती कार राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्याची असल्याचे समोर आले आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील हा पदाधिकारी असून त्याच्या चुलत्यांची ही कार आहे. ही कार पोलिसांनी जप्त केली आहे, अशी माहिती मिळाली आहे.

वाचा:

दरम्यान, गजानन पंढरीनाथ मारणे उर्फ गजा मारणे उर्फ महाराज हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर दोन हत्या, मोक्कासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तळोजा कारागृहातून त्याची सोमवारी मुक्तता झाली होती. तेव्हा त्याच्या स्वागतासाठी शेकडो समर्थक गाड्यांच्या ताफ्यासह कारागृहाबाहेर जमा झाले होते. तिथून जवळपास ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मारणे हा एक्स्प्रेस वेवरून पुण्याकडे निघाला होता. या गाड्यांनी टोलही भरला नाही. तसेच उर्से टोलनाक्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या मिरवणुकीचे ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंगही करण्यात आले. गुंड मारणेची ही मिरवणूक सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मारणे आणि त्याच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करत पुन्हा एकदा कारवाईचे पाऊल उचलले. या सर्वात मारणे ज्या कारमध्ये होता ती कार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची असल्याचे समोर आल्याने या साऱ्या प्रकाराला अधिकच गंभीर स्वरूप आले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here