म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

कोविडमुळे अतिदक्षता विभागामध्ये वैद्यकीय उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी तज्ज्ञांनी या नव्या थेरपीचा उपयोग सुरू केला आहे. या थेरपीमुळे रुग्णांना वैद्यकीय उपचारांमध्ये मदत होत असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. मात्र हे मुख्य औषध नसून उपचारपद्धतीमध्ये सहकार्य देणारे औषध आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

थायमोसीन अल्फा १, इम्युनोसिन अल्फा असे या औषधांचे नाव असून यातील घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती अधिक सक्षम होते. त्यामुळे संसर्गामध्ये ज्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे आहे, त्यांना दिलासा मिळू शकतो. या वैद्यकीय उपचारपद्धतीचा कालावधी हा सात दिवसांचा आहे, कोणत्याही गंभीर दुष्परिणांशिवाय या औषधांचा प्रतिसाद रुग्णांमध्ये चांगला असल्याचे दिसून आले आहे.

वाचा:

करोना संसर्ग असलेल्या काही रुग्णांमध्ये विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या व्याधीही आहे, त्यांच्यामध्येही या औषधांचा परिणाम चांगला दिसून आल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. मधुमेह, उच्चरक्तदाब, मूत्रपिंडाचा आजार तसेच वृद्ध रुग्णांमध्ये या उपचारपद्धतीचा लाभ असल्याचे दिसून आले आहे. संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी या औषधाचा वापर वीस रुग्णांमध्ये केल्यानंतर तो सकारात्मक असल्याचे आढळून आले. गंभीर असलेल्या या रुग्णांचे मृत्यू टळले आहेत. हे औषधोपचार देताना ते नेमके कोणत्या वयोगटातील रुग्णांमध्ये द्यायला हवेत, याचे योग्य प्रकारचे वैद्यकीय निदान होणे गरजेचे असल्याचे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले.

वाचा:

करोना रुग्णांमध्ये साइटोकाइन म्हणजे तीव्र स्वरूपाची अचानक गुंतागुंत निर्माण होऊन अवयव निकामी होतात, अशी वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होण्यापूर्वी हे औषध फायदेशीर ठरू शकते, असे ते म्हणाले. अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी आतापर्यंत अशा पच्चावन्न रुग्णांसाठीही औषधोपचार पद्धती वापरल्याचे सांगितले. हे औषध लाभदायी असले तरीही ते वैद्यकीय उपचारांमधील मुख्य उपचार नसून सहायक औषध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. के.जे. सोमय्या वैद्यकीय महाविद्यालयातील भूलशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. चिन्मय गोडबोले यांनी, या औषधाच्या वापरामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत होत असल्याचे सांगितले. ऑक्सिजनच्या वापरावर असणारे अवलंबित्व कमी झाले आहे, मात्र वैद्यकीय सल्ल्यानंत तसेच संपूर्ण निदानानंतरच या औषधोपचारपद्धतीचा वापर करावा असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिकारशक्ती सक्षम
कावीळ, एचआयव्ही आणि एसएआरएस सारख्या आजारामध्ये रोगप्रतिकारशक्ती अत्यल्प असते. या आजारांत या औषधांचा वापर काही प्रमाणात उपयुक्त ठरला आहे. कोविडमध्ये एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारकशक्तीवर घाला घातला जातो. थायमोसिन अल्फा हे टी पेशी सक्रिय करतो जो विषाणू नष्ट करण्यास मदत करतो आणि प्रतिकारशक्ती उत्तम प्रकारे सुधारतो.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here